कमांडर संजय सोलवट यांची व्यवस्थापन क्षेत्रात नवी इनिंग! - अजितदादांच्या हस्ते पुण्यात शुभारंभ


पुणे |

बार्शी येथील सेवावृत्ती प्राचार्य नेताजी सोलवट व सौ.कुसुमताईंचे चिरंजीव तसेच विरोधी पक्षनेत्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अविनाश सोलवट यांचे धाकटे बंधू कमांडर संजय सोलवट यांनी "सेवियन" या कंपनीच्या माध्यमातून विकास व्यवस्थापन क्षेत्रात आपली नवी इनिंग सुरु केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते कंपनीचा शुभारंभ रॉयल वेस्टर्न इंडियन टर्फ क्लब येथे पार पडलेल्या सोहळ्यात झाले.

भारतीय नौसेनेत कमांडर संजय बोल्ट यांनी तब्बल वीस वर्षे सेवा बजावली.आता नौसेतून निवृती घेवून विकास व्यवस्थापन क्षेत्र हे सेवा क्षेत्र असलेली  "सेवियन" ही कंपनी स्थापन केली. डॉ.साबीर शेख,एस.एस.पाटील व समीर सय्यद यांना त्यांनी या कार्यात सोबत घेतले आहे.अजितदादांनी कंपनीच्या बोधचिन्हाचे अनावरण करुन सोलवट परिवार व कंपनीच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या.शुभारंभ सोहळ्यास सोलवट परिवाराचे सदस्य, अविनाश सोलवट यांचा मित्र परिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
-राजा माने,
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
प्रदेशाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र.

Post a Comment

0 Comments