शिक्षकांना फसवून शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

पुण्यातील खेड तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याच्यार करण्यात आला आहे. पीडिता शाळेत असताना तिला खोटं सांगून हॉटेलवर नेण्यात आले. तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पुन्हा शाळेत सोडण्यात आले. सदर घटनेत राजगुरुनगर पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत पीडित चिमुकली शिकत आहे. तिचे वडिल खेडयेथे तिला बोलवत आहेत असे सांगून एका व्यक्तीने तिला शाळेतून बाहेर आणले. त्यानंतर जवळच्या एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. नंतर या नराधमाने चिमुकलीला पुन्हा शाळेत सोडले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच  शाळेच्या ताब्यात असताना ही घटना घडल्याने शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळेतून घरी गेल्यावर चिमुकलीने घडलेली घटना आई बाबांना सांगितली. त्यानंतर तिच्या आईने राजगुरुनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण सोनबा राक्षे असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments