वैरागमध्ये गतिरोधक बसवा या मागणीसाठी आम आदमी पक्षाकडून निवेदन


बार्शी |

बार्शी सोलापूर राज्य महामार्गावर वैराग शहरा नजीक एकही गतिरोधक नाही गतिरोधक बसवावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल अशा आशयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर व पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

नव्याने झालेले बाशी सोलापूर महामार्ग मौजे वैराग या मोठ्या शहेराच्या ठिकाणी एकही स्पीड ब्रेकर नाही. वैरागमध्ये प्रवेश करतात बँक ऑफ महाराष्ट्रा सेंटर बैंक ऑफ इंडिया तसेच गांधी कॉलेज विद्या मंदिर हायस्कुल, कन्या प्रशाला, सरकारी रुग्णालय व छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोहोळ चौक या चौकातुन विद्यार्थी विद्यार्थीनी वयस्कर मानसांचा जास्त प्रमाणा ये-जा असते छत्रपती शिवाजी चौकातुन जाताना येताना शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी जिव मुठीत घेऊन शाळेत जातात व येतात या चौकात स्पीड ब्रेकर व झेब्रा क्रॉसींग गरजेचे आहे. तसेच मोहोळ चौक, संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बँक ऑफ महाराष्ट्रा या ठिकाणी स्पिड ब्रेकरची व झेब्रा क्रॉसिंगची अत्यंत गरज आहे. स्पिड ब्रेकर नसल्यामुळे वैराग शहेरात येथे मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे अपघात नेहमीच होतात. त्यामुळे ह्याची आपण गंभीर दखल घ्यावी अन्यथा आम आदमी पार्टी बार्शी तालुक्याच्या व वैराग विभागाच्या वतीने तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल.

यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव रुद्रप्पा बिराजदार, वैराग विभाग अध्यक्ष ताजुद्दीन शेख, तालुकाध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर, सुरेश ननवरे बाबासाहेब क्षिरसागर आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments