नवस फेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी अजमेर दर्ग्यातमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी शनिवार अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यावर माथा टेकला आणि आपला नवस फेडला. यावेळी त्यांनी 'मजार'वर चादर अर्पण केली आणि कुटुंबाच्या खुशहालीसाठी प्रार्थनाही केली.

अजमेर येथे सुफी संत हजरत ख्वाजा मोईउद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा असून लता शिंदे या शनिवारी कुटुंब सदस्यांसह या दर्ग्यात गेल्या. यावेळी त्यांनी चादर आणि फुलांचा गुच्छ दर्ग्याचे खादीम सय्यद वाली मोहम्मद नियाजी यांच्याकडे दिला. यावेळी अंजुमन कमेटीचे गुलाम किवरिया, मुनवर चिश्ती आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा लवकरच अजमेर दर्ग्यात प्रार्थनेसाठी येतील असा लता शिंदे यांनी दर्गा कमिटीला सांगितले.

Post a Comment

0 Comments