जलतरण स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाची विभागीय स्तरावर निवड


दि. २ डिसेंबर २०२२ रोजी  श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचा जलतरण तलाव येथे  १४/१७/१९ वयोगटातील मुले आणि मुली शालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धांमध्ये ११ तालुक्यातून खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालयाच्या वयोगट १४ फ्रीस्टाइल १०० मीटर व २०० मीटर प्रथम क्रमांक जयसिंह शिंदे ,१०० मीटर फ्रीस्टाइल द्वितीय क्रमांक क्रमांक कार्तिक जगदाळे, ५० मीटर व २०० मीटर फ्रीस्टाईल मध्ये तृतीय क्रमांक माधव शिंदे,वयोगट १४ मुलींमध्ये फ्रीस्टाइल ५० मीटर प्रथम क्रमांक मधुरा गुळवे, वयोगट १७ फ्रीस्टाइल ५० मीटर द्वितीय क्रमांक टिना डंबरे, ५० मीटर ब्रेस्ट स्टॉक व ५० मीटर बॅकस्ट्रोक मध्ये प्रथम क्रमांक सई शिराळकर ,वयोगट १७ मुलामध्ये फ्रीस्टाइल ४०० मीटर व २०० मीटर प्रथम क्रमांक उदय जाधव, वयोगट १९ मुलींमध्ये फ्रीस्टाइल ८०० मीटर व ५० मीटर प्रथम क्रमांक वैष्णवी शिराळकर,  फ्रीस्टाईल १०० मीटर प्रथम क्रमांक व २०० मीटर द्वितीय क्रमांक संजीवनी मोरे या  एकूण १० खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली.

या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक श्री.अनिल पाटील, श्री.पी.डी पाटील, श्री.योगेश उपळकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे,सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य जी.ए.चव्हाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments