संतापजनक! मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर बलात्कार



प्राप्त माहितीनुसार, 31 वर्षीय पीडित महिला ही तिच्या पती व लहान मुलासोबत रामदास पेठ  पोलिस स्टेशन परिसरात राहते. दरम्यान, पीडितेच्या घरी खैर मोहम्मद प्लॉट परिसरातील रहिवासी शेख रिजवान शेख अहमद याचे येणे-जाणे सुरू राहायचे. पीडितेचा पती कामानिमित्त घराबाहेर गेल्यावर ती घरात एकटी राहत असल्याचे आरोपी शेख रिजवान शेख अहमद याच्या लक्षात आले.

3 जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेख रिजवान याने पीडितेच्या घरात प्रवेश करत पीडितेला मारहाण केली, तसेच पीडितेला धमकी देत, तिच्यावर अत्याचार केला. यानंतर, तीन वेळा आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान, 4 डिसेंबर रोजी आरोपी शेख रिजवान याने अमरावती येथील मुजफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या इमरान खान रमजान खान नामक मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.

तसे न केल्यास पीडितेचे अश्लील व्हिडीओ, तसेच छायाचित्र काढून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत, पीडितेवर दोघांनी अत्याचार केला. दोघांच्या अत्याचाराला कंटाळून पीडित महिलेने पतीसोबत रामदासपेठ पोलिस ठाणे गाठले व आरोपीविरुद्ध तक्रार दिली, यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध कलम 376 (२), (एन), 323 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments