घटस्फोट मिळवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य ; घटनेने खळबळएक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका पतीने पत्नीला घटस्फोट देण्यासाठी भयानक कट रचला आहे. पती पत्नीचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. जर यात एकाही व्यक्तीने धोका दिला तर त्या नात्याला तडा जातो. पतीला कोणत्याही बहाण्याने पत्नीला घटस्फोट हवा असतो. त्यामुळे त्याने एक भयानक पाऊल उचलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे पत्नी ही गर्भवती होती.

डॉक्टरांच्या संगनमताने रचला कट
मिळालेल्या माहितीनुसार पती गर्भवती पत्नीला बहण्याने डॉक्टराकडे घेऊन गेला. तिला न कळता डॉक्टरांच्या मदतीने तिला एचआयव्हीचे इंजेक्शन दिलं. काही दिवसांनी पत्नी रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता, तिची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह निघाली. पीडित पत्नीला हे समजताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

हे प्रकरण आंध्र प्रदेशातील ताडेपल्ली भागातील आहे तर
दुसरीकडे आरोपी पती तिला घटस्फोट देण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा नवराही हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तिला एक मुलगी आहे आणि तिच्या नवऱ्याला तो मुलगा हवा आहे, जो मुलगा जन्माला यावा म्हणून हट्ट करतोय. दरम्यान पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. घटस्फोटासाठी नवऱ्याने लावलेलं डोकं ऐकून पोलिसही हैराण झाले आहे.

Post a Comment

0 Comments