कोल्हापूर |
मराठी साहित्य अकादमी, मध्यप्रदेश संस्कृती परिषदेच्या वतीने देण्यात येणारा "अखिल भारतीय भा. रा. तांबे कृति पुरस्कार"-2020 ची आज घोषणा करण्यात आली. मराठी भाषेमध्ये योगेश सोमण यांच नाट्यलेखन असलेल 'सुपारी डॉट कॉम' (Supari.com) यांच्या साहित्यकृतीस तर कोल्हापूरच्या सुचिता घोरपडे यांचा कथासंग्रह "खुरपं" यास जाहीर झाला. या पुरस्कारा अंतर्गत 51,000/- (एकावन्न हजार) रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
कोल्हापूर-निपाणी भागातील वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण बोलीत ग्रामीण जीवन घेऊन येणार्या कथा लिहिणाऱ्या लेखिका सुचिता घोरपडे यांचा खुरपं हा पहिलाच कथासंग्रह! कृषीविश्वाशी निगडीत ग्रामीण जनजीवनाच्या पार्श्वभूमीवर घडणारा घटना अवकाश पात्र-प्रसंग या सगळ्यांना सामावून घेणा-या कथा या संग्रहात आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही 'खुरपं' कथासंग्रहाने स्थान मिळवले आहे. महाराष्ट्रातील अनेक पुरस्कार या कथासंग्रहाने मिळवले आहेत.
मराठी गौरव दिनानिमित्त (फेब्रुवारी-2023 च्या शेवटच्या आठवड्यात) भोपाळ येथे आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील.
-------------------
कोट...
आजवर 'खुरपं'ला महाराष्ट्रातील पुरस्कार लाभले. परंतु हा 'खुरपं' ला लाभलेला महाराष्ट्राबाहेरील पहिला आणि खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. आपल्याला समृद्ध अशा मराठी भाषेचा वारसा लाभला हे आपले थोर भाग्य. महाराष्ट्रातील अनेक बोली लुप्त होण्याच्या मार्गावर असताना बोली भाषेतील या कथासंग्रहाला अमराठी राज्यातून मराठी बांधवांकडून 'मराठी साहित्य अकादमी, मध्यप्रदेश संस्कृती परिषदे'च्या वतीने देण्यात येणारा "अखिल भारतीय भा. रा. तांबे कृति पुरस्कार"-2020 हा पुरस्कार लाभावा ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
- सुचिता घोरपडे, लेखिका
0 Comments