"डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली चित्राक्षनिर्मिती कार्यालयास सदिच्छा भेट...!"


पुणे |

चित्राक्ष निर्मिती कार्यालयास पुण्यामध्ये डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सदिच्छा भेट दिली, व भाऊराव कऱ्हाडे यांच्यासोबत चित्रपट विविध विषयावर चर्चाही करण्यात आली. 

भाऊराव कऱ्हाडे वास्तवावर भाष्य करणारे जोडणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. 'ख्वाडा’ या चित्रपटाने सिनेप्रेमींचे लक्ष वेधत यशस्वी ठरला. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांचा 'बबन' हा चित्रपटही सुपरहिट ठरला आहे. ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या भाऊरावांना सिनेमा जगतात ओळखले जाते. 'टीडीएम' व 'हैदराबाद कस्टडी' हा त्यांचा सिनेमा २०२३ ला मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.  येणाऱ्या दोन्ही सिनेमासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी भेट देऊन सदिच्छा दिल्या.

'टीडीएम' व 'हैदराबाद कस्टडी' हे दोन्ही सिनेमे वेगळ्या धाटणीचे असले तरी टीडीएमचे बकुळा हे गाणं नुकतंच रिलीज झाला आहे व ते प्रेक्षकांच्या मनाचा ठाव देखील घेत आहे. 'चित्राक्ष फिल्म्स' पुण्यातील कार्यालयास ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी सपत्नीक भेट दिली. यावेळी भाऊराव कऱ्हाडे यांच्या बकुळा या नुकत्याच रिलीज झालेल्या गाण्याचं कौतुकही त्यांनी केलं.

Post a Comment

0 Comments