सोलापुरात राष्ट्रवादीच्या वतीने अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन



सोलापूर |

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आमदार अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाले आहे.सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, पदाधिकऱ्यानी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत सोमवारी सायंकाळी शहरातील चार पुतळा परिसरात अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन केले आहे.यावेळी अब्दुल सत्तार यांनी जाहीर माफी मागावी व सत्तेतुन पायउतार व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा-
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी.आणि मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करत त्यांना मंत्रीपदावरून हटवावे अशी मागणी सोलापुरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकऱ्यानी केली आहे.यावेळी संतोष पवार,जुबेर बागवान,अमीर शेख,सुनीता रोटे,मोनिका पवार आदी उपस्थित होते.चार पुतळा येथे झालेल्या आंदोलनात यावेळी सुरुवातीला अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आणि नंतर त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments