"माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईल" शालेय विद्यार्थ्याची वर्गातील मुलीला धमकी


पुणे |

इंस्टाग्राम वर या शालेय विद्यार्थ्याने थेट "माझी बायको होशील का?" असे स्टेटस ठेऊन पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार पुण्यातील उच्चभ्रू भागातून समोर आला आहे. हडपसर भागात एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या 14 वर्षीय वयाच्या मुलाने 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलाने पीडित मुलीचा फोटो घेऊन "माझी बायको होशील का?" असं स्टेटस इंस्टाग्रामवर ठेवले होते. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणात पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे ही एकाच वर्गात शिकायला आहेत. 

काही दिवसांपासून हा मुलगा त्या मुलीचा पाठलाग करीत असे तसेच मैत्री करण्यासाठी तिला वारंवार धमक्या द्यायचा. माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईल अशी धमकी ही त्याने या मुलीला दिली होती. त्या मुलीने मात्र काहीच उत्तर न दिल्यामुळे त्याने तिचा फोटो घेऊन "माझी बायको होशील का" असे स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवले. हा सगळा प्रकार त्या मुलीने आईला सांगितल्यानंतर आईने पोलिसात तक्रार दिली आहेपालकांनी आपल्या पाल्यांवर सोशल मीडियावर इतक्या अल्पवयीन वयात काय करतात यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे, पोलिसांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments