सोलापुरात काँग्रेस भवनसमोर आंदोलन; १९ जणांवर गुन्हा



सोलापूर - येथील काँग्रेस भवनसमोर विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी भाजयुमोच्या १९ जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस कर्मचारी दत्तात्रय धोंडप्पा देवमाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल कंदलगी, अंकुश पसारे, शिवराज पवार, श्रीशैलप्पा शेटे, राहुल घोडके, तन्मय भोगडे, शंकर बंडगर, गणेश साखरे, रोहन सोमा, सिध्दारूढ हिटनळ्ळी, रामभाऊ वाकसे, शिवानंद कावडे, सिध्दार्थ मंजेली, संदीप धुगाणे, नागेश येळमिट्टी, सचिन शिवदास निर्मल, विजय कुलते, नागेश रामपुरे, बसवराज गदगे (सर्व रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनुद्गार व अपमानित करणारे वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनास परवानगी नाकारली असताना व त्यांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून निषेध आंदोलन करून यांच्या पोस्टरवर शाई टाकली. अधिक तपास फौजदार बादोले हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments