आपल सरकार अन् आम्ही राजाभाऊंच्या पाठीशी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


बार्शीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा नागरी सत्कार

आपले सरकार अन् आम्ही सर्वजण राजाभाऊ यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत अशी ग्वाही उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बार्शी येथील जुना गांधी पुतळा येथे जाहीर सभेत ते बोलत होते.
महसूलमंत्री थथा जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार राणाजगजिसिंह पाटील,सुरेश धस, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, प्रशांत परिचारक , राम सातपुते, ॲड रणवीर राउत,आदि उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकार आल्याबरोबर शेतकऱ्यांना ७हजार कोटी रुपये दिले. पाउस, पूर, पडझड, अशा नैसर्गिक आपत्तीत निधी दिला. ऐतिहासिक ६५मि. मी. पावसाची अट न ठेवता मदत केली. एनडीआरएफच्या दुप्पट मदत दिली. 
माझ्या करीता आजचा दिवस पुण्यांचा आहे. सकाळी मला पांडुरंगाची पुजा करण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या चरणी माझे मस्तक ठेकून त्याठिकानच पुण्य घेउन भगवंताच्या नगरीत आलो अन् भगवंताच्या चरणी देखील मला माथा टेकण्याची संधी मिळाली.
सर्वात कठीण योजना असेल तर ती भुयारी गटार योजना ही योजना आमदार राजाभाऊंनी संघर्ष करून पूर्ण केली.
तालुका सिंचनाखाली आणण्याचे काम होणार आहे. आ राजाभाऊनी मागणी केली की ती पूर्ण होतेच. बार्शीकरांनी  राजाभाऊ सारख्या योग्य लोकप्रतिनिधींची निवड केली. योग्य निवड केल्याने तुमच्या मतांचे दान होते.


आमदार राजेंद्र राउत यांनी तालुक्यातील प्रश्न मांडत फडणवीस साहेब शहरात व तालुक्यात पाणी पुरवठ्याचा तुटवडा जाणवत आहे. पाणी पुरवठा योजना मार्गी लावावी . पाण्याचा विषय मार्गी लागला तर शेतकऱ्यांचा  तुम्हाला दुवा लागेल

Post a Comment

0 Comments