शिवसेना आमच्यामुळेच फुटली; आदित्य ठाकरेंची मोठी कबुली..



मुंबई  |

शिवसेनेत जी फूट पडली या फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार असल्याचं विधान  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनी ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. "उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पण आम्हाला वाटलं नव्हतं ते पाठीमागून वार करतील", अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्ला केला.

“राजकारण हे फार घाणेरडे ठिकाण नाही, किंवा लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक  वेळी चिखलात जावे लागत नाही, असे आम्हाला वाटत होते. पण ती आमची चूक होती. असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं. मध्यावधीसाठी भाजपला दोष देणार का, असा सवाल त्यांनी केला असता आदित्य ठाकरे म्हणाले की मी त्यांच्यासारखे घाणेरडे राजकारण करत नाही.

Post a Comment

0 Comments