वैरागजवळ ट्रॅक्टरचा हेड अंगावर पडुन ट्रॅक्टर चालकाच्या जागीच मृत्यूवैराग |

ऊस वाहतुक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाल्याने ट्रॅक्टरचा हेड पलटी होवुन अंगावर पडल्याने ट्रॅक्टर चालकाच्या जागीच मृत्यू झाला .काकासाहेब सुभाष भुजबळ रा. भोसा ता . जि . लातुर यांनी वैराग पोलीसात माहिती दिल्याने घटनेची नोंद झाली आहे .

 सदर घटना 16 रोजी बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास (जवळगाव)  अंबाबाईची वाडी ते ज्योतीबाचीवाडी रस्त्यावर घडली .बबन साहेबराव भोसेकर ( वय 50 )रा. भोसा ता.जि. लातुर असे मयत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे .

 16 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आंबाबाईची वाडी ते ज्योतीबाची वाडी जाणा-या  रोडवर अंबाबाईची वाडी ( जवळगाव )ता.बार्शी येथील रामगिरी विद्यालयाजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर अचानक रोडच्या बाजूला असणार्‍या चारीमध्ये ट्रॉलीसह पलटी झाल्यामुळे  ट्रॅक्टरचा हेड देखील पलटी झाला आणी ट्रक्टरचा हेड ट्रॅक्टर चालकाच्या  अंगावर पडल्याने चालक जागीच मयत झाला. तपास - पोलीस अंमलदार  सोनकांबळे करित आहेत .

Post a Comment

0 Comments