धनगर आक्रोश मेळाव्यास यशवंत ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा ; यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. संतोष कोळेकर यांची माहिती



कोल्हापूर |

पद्मश्री. डॉ.  विकासजी महात्मे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली 6 नोव्हेंबर 2022 रोजी छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे धनगर आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या धनगर आक्रोश मेळाव्यास यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकारी आढावा बैठकीमध्ये यशवंत ब्रिगेड च्या वतीने बिनशर्त जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. 
      
  अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मेंढपाळ बांधवाच्या अनेक समस्या आहेत. महिलाच्या शिक्षण व आरोग्यबाबत गंभीर प्रश्न आहेत. युवा वर्ग स्पर्धा परीक्षा करताना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. हे प्रस्न मार्गी लावण्यासाठी आक्रोश मेळाव्यास बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

 यावेळी यशवंत ब्रिगेड संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पत्रकार अमोल गावडे , धनगर समाज सेवा संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रावसो रानगे , शिक्षक प्राध्यापक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. दीपक माने , शाहूवाडी तालुकाध्यक्ष प्रकाश गोरड , यशवंत ब्रिगेड विद्यार्थी आघाडी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अभिनंदन रानगे, करवीर तालुकाध्यक्ष परशराम पुजारी , विश्वास रानगे,  सोमनाथ मांडले, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments