तीन हजार रुपयांसाठी मावस बहिणीच्या सासूचा खून; जेलरोड पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल



सोलापूर |

जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. फक्त तीन हजार रुपयांच्या उधारी वरुन नातेवाईकां सोबत भांडण करून एका वृद्ध महिलेस लाथाबुक्क्यांनी, पोटात,पाठीत, व डोक्यास मारहाण करूंन खून करण्यात आला आहे. अंबु विठ्ठल कट्टीमणी असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे.याबाबत जेलरोड पोलीस ठाणे येथे सुरेखा नितीन कट्टीमणी (वय 25, रा राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून फिर्यादीचा मावस भाऊ चंद्रकांत उर्फ बबलू चिकाटे, मावशी नंदा चिकाटे, मावस बहीण संतोषी उर्फ संतु चिकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास मोतेकर करत आहेत.

तीन हजार रुपयांची उधारीसाठी हाणामारी-

फिर्यादी सुरेखा हिच्या पतीने नितीन कट्टीमनी यांनी नातेवाईकांकडून तीन हजार रुपये उसने पैसे घेतले होते.या उसने पैशांच्या कारणावरून 20 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वादविवाद झाला होता. वादविवाद नंतर किरकोळ हाणामारी देखील झाली होती. यावेळी नितीन कट्टीमणी यांच्या आई अंबु कट्टीमणी यांनी हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी चंद्रकांत उर्फ बबलू चिकाटे याने नितीन कट्टीमणी व अंबु कट्टीमणी यांना मारहाण केली होती. याबाबत जेलरोड पोलीस ठाणे येथे 20 ऑक्टोबर रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती.

उधारीच्या तीन हजार रुपयांवरून पुन्हा हाणामारी व खून-

तीन हजार रुपयांच्या उधारी वरुन 27 ऑक्टोबर रोजी चंद्रकांत उर्फ बबलू चिकाटे, मावशी नंदा चिकाटे, मावस बहीण संतोषी उर्फ संतु चिकाटे हे तिघे एकत्र येऊन नितीन कट्टीमणी यांसोबत भांडण करू लागले. यावेळी अंबु कट्टीमणी यांनी 20 ऑक्टोबर रोजी दिलेल्या पोलीस फिर्यादीचा राग देखील त्यांच्या मनात होता. तिघां संशयीत आरोपीनी नितीन कट्टीमणी व अंबु कट्टीमणी यांस लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत अंबु कट्टीमणी या जबर जखमी झाल्या होत्या. आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी अंबु व नितीन यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. पण 28 ऑक्टोबर रोजी उपचार सुरू असताना अंबु कट्टीमणी यांचा मृत्यू झाला. याबाबत जेलरोड पोलिसांनी ताबडतोब खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पीएसआय मोतेवार करत आहेत.

Post a Comment

0 Comments