सोलापूर |
पोलीस पब्लिक स्कुल मधील इंग्रजी विषयाची शिक्षिका निलोफर असिफ मुजावर (वय 38,वर्ष रा,सहारा नगर, सोलापूर) या शिक्षकेला शहरातील गेंट्याल चौक येथे डंपरने चिरडले आहे. बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास हा अपघात झाला आहे.शाळेत शिकवून घरी परत जाताना काळाने घाला घातला आहे. अपघातानंतर मोठी गर्दी झाली होती. याची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात पोलीस पब्लिक शाळेतील शिक्षक व मृत महिलेचे नातेवाईक दुःख व्यक्त करत होते. याबाबत माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले तर एमआयएमचे नगरसेवक अजहर हुंडेकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
खराब रस्त्याचा बळी-
सोलापूर शहरात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या खराब रस्त्यावरून वाहनांची संख्या अधिक झाली आहे. दिवाळी असल्याने दुचाकी वरून जाणाऱ्या संख्या देखील वाढली आहे. बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास महिला शिक्षिका निलोफर मुजावर या आपल्या दुचाकी (एमएच13 सीसी 6047) या वाहनवरून जात होत्या. एमएच 13 डी क्यू 5555 हा डंपर देखील अशोक ते गुरुनानक चौक या मार्गाने जात होता. त्यामध्ये खडी खचाखच भरली होती. गेंट्याल चौकातील लोकसेवा शाळे जवळ मोठा गतिरोधक आला, त्यावेळी महिलेचा तोल जाऊन ती खाली कोसळली त्याच क्षणी डंपरचे मागील चाक शिक्षिकेच्या डोक्यावरून गेले. जाग्यावरच शिक्षिकेचा मृत्यू झाला. सदर बाजार पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन साठी दाखल केले आहे.
शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची शिक्षकांची गर्दी-पोलीस पब्लिक स्कुल मधील शिक्षिका निलोफर याचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, शाळेतील इतर शिक्षक व नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. मृत शिक्षिका ही पोलीस पब्लिक स्कुल मध्ये 7 वीच्या वर्गाला इंग्रजी विषय शिकवत होती.निलोफर मुजावर यांना तीन अपत्य आहेत, पती हे देखील ग्रामीण भागातील एका शाळेत शिक्षक आहेत.
0 Comments