बसपाचे वैराग शहराध्यक्ष ताजुद्दीन उर्फ बाबा शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामेवैराग |

बार्शी तालुक्यातील वैराग हे विविध कारणासाठी चर्चेत असणारे ठिकाण आहे, राजकारण असो वा समाजकारण उपयोगाची चर्चा तर होतेच. बहुजन समाज पार्टीचे वैराग शहराध्यक्ष ताजुद्दीन उर्फ बाबा शौकत शेख यांनी त्यांच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे वैराग भागासह बार्शी मध्ये बहुजन समाज पार्टीला मोठे खिंडार पडणार आहे.

ताजुद्दीन उर्फ बाबा शेख हे सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असे नाव मानले जाते, गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षपदाची धुरा होती. परंतु बाबा शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैयक्तिक कारणास्तव आमच्या पदाचा राजीनामा देत आहोत असे पत्र पक्षाला दिले आहे, बाबा शेख यांच्या समवेत वैराग कोषाध्यक्ष शाहरुख शेख व सोलापूर जिल्हा सचिव शुभम गोवर्धन यांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

Post a Comment

0 Comments