सातारा |
सातारा जिल्ह्यातील भिलार येथे यशवंत ब्रिगेडच्या अध्यक्ष डॉ. संतोष कोळेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन धनगर समाजाचे प्रश्न , समस्या सोडवण्याबाबत चर्चा केली. तसेच सर्व मुली व महिलांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत व प्रवासासाठी 'पु. रा. अहिल्यादेवी होळकर पास योजना' सुरू करण्याची मागणी केली.
असंख्य धनगर समाज दुर्गम, डोंगर भागात रहात असून आर्थिकदृष्टया मागासलेला आहे. त्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याची प्रयत्न होणे गरजेचे आहे. यावेळी प्रा. डॉ. संतोष कोळेकर व यशवंत ब्रिगेड चे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments