जागर दांडिया उत्सवचा..! बार्शीमध्ये 'यांनी' आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये घुमला दांडियाचा आवाज

बार्शी |

गणपती बप्पाच्या विसर्जनानंतर सगळ्यांना वेध लागतात ते नवरात्रीचे, अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या नवरात्र उत्सवाला आपण शारदीय नवरात्र असे ही म्हणतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. तसेच नऊ दिवस देवीची पूजा आरती मनोभावे केली जाते, अनेकजण या नऊ दिवसांमध्ये विविध व्रत, उपवास करतात, तसेच काहीजण चप्पल न घालण्याचाही नियम पाळतात.  ह्या नवरात्रीचे नऊ दिवसात महिला नऊ रंगाच्या साड्या घालतात. नवरात्रीचा अजून एक विशेष म्हणजे नवरात्रीमध्ये दांडिया, गरबा यासारखे खेळ खेळले जातात. आनंद द्विगुणित व्हावा हा प्रमुख उद्देश. बार्शी येथील भाग्यकांता ग्रुप, लिओ क्लब ऑफ बार्शी टाउन तसेच क्रेडाई, बार्शी. यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रँड दांडिया नाईट्स 2022 चे आयोजन करण्यात आले होते. मनुष्य प्राणी हा सण, उत्सव बाबतीत अत्यंत प्रिय असल्यामुळे तो वेगवेगळे सण, उत्सव तो मोठ्या आनंदाने साजरा करतो. येथील गोकुळ गार्डन येथे दिनांक 15 व 16 ऑक्टोबर रोजी ग्रँड दांडिया नाईट्सचे आयोजन करण्यात आले होते. पाच वर्षापासून ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या सर्व स्तरातील व्यक्तींनी यामध्ये सहभाग घेऊन, दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. पहिल्या दिवशी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, बबन व टीडीएम फेम सिनेअभिनेत्री शितल पाटील, तसेच स्पेनका ग्रुपचे सर्वेसर्वा सुहास आदमाने, मिसळ क्षेत्रातील मिसळ कट्टाचे मालक युवराज काळे, तसेच इंस्टाग्राम रिल्स स्टार स्नेहा पाटील, श्वेता तासगावकर, व प्रीती बांगर, युवा कीर्तनकार ह.भ.प.भारती अडसूळ व मराठी सिनेअभिनेते अभय चव्हाण यांनी हजेरी लावली.

दांडियाच्या दुसऱ्या दिवशी पावसाचे वातावरण असून देखील, अनेक सहभागींचा उत्साह ओसंडून वाहत होता, त्यामध्येच स्वराज्य रक्षक संभाजी फेम तथा अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या उपस्थितीने स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला. या दोन दिवसीय ग्रँड दांडिया नाईट्स मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आलेल्या होत्या. ज्यामध्ये लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, जनरल दांडिया राऊंड स्पर्धा, ग्रुप दांडिया स्पर्धा, जनरल गरबा स्पर्धा, हिच राऊंड स्पर्धा, अशा विविध स्पर्धा संपन्न झाल्या. येणाऱ्या प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ काढून त्यांनाही विविध बक्षीसे देण्यात आली.

सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते भाग्यकांता ग्रुप, मल्टीकोर क्रिएशन, श्री.गुरुकृपा नागरी सहकारी पतसंस्था व खमक्या इंडिया या चार आस्थापनांचा लोगो सादरीकरण समारंभ पार  पडला. प्रथम क्रमांकाचे बक्षीस चांदीची दांडिया बार्शी येथीलच प्रसिद्ध सुवर्ण पतपेढीचे चांदमल ज्वेलर्सचे मालक शशांक गुगळे यांच्यातर्फे देण्यात आले. चांदीची दांडियाचे मानकरी सुनील ललवाणी व भाविका बंबोली यांनी जिंकली. ग्रुप दांडियामध्ये मोठ्या गटात प्रथम क्रमांक आझादी हिंद ग्रुप, द्वितीय क्रमांक कांच खेलिया ग्रुप, तृतीय क्रमांक स्टेप ऑफ ग्रुप यांनी मिळवला. तर लहान गटामध्ये प्रथम क्रमांक बार्शी रायझिंग स्टार, द्वितीय क्रमांक ड्रीमिंग दांडिया यांनी जिंकला. तर छोट्या गटांमध्ये बार्शी रायझिंग स्टार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. ग्रुप गरबा राऊंडमध्ये प्रथम क्रमांक जीएसटी ग्रुप, द्वितीय क्रमांक  ट्रेंडिंग नारीज यांनी तर तृतीय क्रमांक यांनी पटकावला. दांडिया कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्टीकोर क्रिएशनचे संचालक तथा ज्येष्ठ संपादक राजा माने, मुरलीधर चव्हाण, अमित इंगोले, रोहन नलवडे, गणेश शिंदे तसेच क्रेडाई बार्शीचे अध्यक्ष चेतन जैन, कॉर्डिनेटर पल्लवी सोनीग्रा, गुंजन जैन, अतुल सोनीग्रा, अभिजीत (मुन्ना) सोनीग्रा, तसेच लिओ क्लब बार्शी टाउनचे अध्यक्ष यश मेहता, स्वराज लोखंडे इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाग्यकांता ग्रुपचे विजय शिखरे, ओंकार हिंगमिरे, निर्भय चव्हाण, सुरज ठोंबरे,आदित्य शिखरे, अजय चव्हाण, सूर्यकांतदादा वायकर, कविता अंधारे, वंदना यादव, उर्मिला वखारिया, कन्हैया डमरे, जमीर कुरेशी, यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमासाठी बार्शीतील विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक,उद्योजकांनी हातभार लावला.

Post a Comment

0 Comments