"आप सोडा, मुख्यमंत्रिपद स्वीकारा अन्यथा तुरूंगवासासाठी तयार रहा", सिसोदियांना भाजपकडून धमकीवजा ऑफर?




दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सोमवारी सीबीआयने सुमारे नऊ तास चौकशी केली. त्यानंतर आपमधून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा सिसोदिया यांनी केला.

आप सोडल्यास मुख्यमंत्री बनवण्याची ऑफर देण्यात
आल्याचेही त्यांनी म्हटले. दिल्लीतील आप सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यावरून सीबीआयने सिसोदिया यांना पुन्हा समन्स बजावले. त्यानुसार, चौकशीसाठी सिसोदिया सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सीबीआय मुख्यालयात दाखल झाले. सरकारच्या धोरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवरून आणि इतर आरोपींशी असलेल्या संबंधांवरून त्यांना प्रश्न विचारण्यात आले. चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना सिसोदिया यांनी दबाव टाकण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला. आप सोडा, मुख्यमंत्रिपद स्वीकारा अन्यथा तुरूंगवासासाठी तयार रहा, असे मला सांगण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. गुजरातमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या राज्यात निवडणुकीआधी आपची लोकप्रियता वाढल्याचा धसका भाजपने घेतला आहे. त्यातून आमच्या नेत्यांना खोट्या प्रकरणांत अडकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप आपकडून केला जात आहे.

Post a Comment

0 Comments