सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक म्हणून शिरीषकुमार सरदेशपांडे यांची नियुक्ती


सोलापूर |

दिवाळी आधीच 43 आयपीएस अधिकाऱ्याच्या शिंदे सरकारने बदल्या केल्या आहेत, अधिकाऱ्याच्या बदल्या संदर्भात आदेश  जारी करण्यात आली आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली असून त्यांच्या जागी शिरीषकुमार एल. सरदेशपांडे यांची नियुक्ती झाल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले.

 गेल्या दोन वर्षापासून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या तेजस्वी सातपुते या पदावर होत्या. नवे पोलीस अधीक्षक हे महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. शासनाने काढलेल्या आदेशात तेजस्वी सातपुते यांच्या बदली बाबतचा उल्लेख केला असला तरी अद्याप त्यांची बदली कोठे झाली उल्लेख नाही, त्यांच्या बदलीसाठी नवा स्वातंत्र आदेश काढण्यात येईल असेही पत्रात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments