'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील वैशालीच्या सुसाईड नोटनं खळबळ
टी.व्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर आता आपल्यात नाही. अवघ्या ३० वर्षांच्या वयात तिनं मृत्यूला कवटाळून तिच्या सर्वच जवळच्यांना मोठा धक्का दिला आहे. वैशालीचा तर मृत्यू झाला पण तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न सतावत आहेत. वैशालीला नेमकं कोण त्रास देत होतं? आपल्या सुसाईड नोटमध्ये वैशालीनं उल्लेख केलेली व्यक्ती नेमकी कोण? जस-जसे वैशालीच्या आत्महत्येशी संबंधीत गोष्टींचा गुंता सुटत आहे तशी अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. चला जाणून घेऊया,वैशालीच्या त्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय काय लिहिलं आहे आणि कोण आहे ती व्यक्ती ज्यानं तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं.

वैशाली ठक्करने आपल्या सुसाइड नोट मध्ये राहूल  नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. राहुलनं वैशालीला फिजिकली आणि इमोशनली खूप त्रास दिल्याचं तिच्या सुसाइड नोटमधून समोर येत आहे. पोलिसांना वैशाली ठक्करची एक डायरी मिळाली आहे, ज्यात तिनं राहूल आणि दिशा नावाच्या एका मुलीचा देखील उल्लेख केला आहे. डायरीत तिनं लिहिलेले शेवटचे शब्द आहेत.

पोलिसांच्या मते डायरीमध्ये वैशालीनं ज्या पद्धतीनं गोष्टी लिहिल्या आहेत,त्यावरनं वाटत आहे की ती डिप्रेशनचा सामना करत होती. काही दिवसांपासून तिच्याकडे कामही नव्हतं. अद्याप यासंदर्भात तपास सुरु आहे त्यामुळे पोलिस कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. अजूनही वैशालीच्या सुसाईड नोटवरनं तपास सुरु आहे असं पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर सांगितले आहे.

वैशालीनं सुसाईड नोटमध्ये राहुल विषयी काय लिहिलं होतं ते जाणून घेऊया.”| आई. आई-बाबा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा मी एक चांगली मुलगी नाही बनू शकले. राहूल आणि त्याच्या कुटुंबामुळेच मी हे पाऊल उचलत आहे. त्यांना माफ करू नका. चांगली शिक्षा द्या. राहूल आणि दिशा यांनी मला अडीच वर्ष शारिरीक आणि मानसिक रित्या खूप छळलं. त्यांना शिक्षा नाही झाली तर माझ्या आत्म्यास शांती नाही मिळणार. तुम्हाला माझी शपथ आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मितेशला सांगा मला माफ कर.

कोण आहे राहूल ?
वैशालीला आत्महत्या करण्यास ज्यानं प्रवृत्त केलं त्याच नाव आहे राहूल नवलानी. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल हा वैशालीचा शेजारी आहे. जो एक बिझनेसमन आहे. वैशालीचं घर इंदौर येथे साई बाग कॉलनीमध्ये आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राहुलमुळे वैशालीनं आत्महत्या केली. वैशालीचं लवकरच लग्न होणार होतं. पण राहूल वैशालीला खूप त्रास देत होता. पोलिस यांसबंधित अधिक तपास करीत आहेत. वैशालीच्या फ्रेंड्सच्या म्हणण्यानुसार, वैशाली डिसेंबरमध्ये लग्न करणार होती. आणि लग्नाच्या दोन महिने आधीच वैशालीनं आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलणं खूप धक्कादायक आहे.

Post a Comment

0 Comments