'तुमच्या चित्रपटापेक्षा रिल्स चांगले' रितेश जेनेलियावर निशाणा


केआरकेनं रितेशच्या आगामी चित्रपटावरुन त्याच्यावर टीका केली आहे, कमाल राशिद खान उर्फ केआरके हा त्याच्या वादग्रस्त व्टिटसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर त्याच्या युट्युब व्हिडिओची मोठी क्रेझ आहे. एखाद्या चित्रपटाबद्दल केआरके काय म्हणतो हे लोकांना जाणून घ्यायला आवडते. त्यानं रितेशच्या आगामी मिस्टर मम्मी चित्रपटावरुन रितेशवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. हा चित्रपट येत्या 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

केआरकेनं त्याच्या नेहमीच्या अंदाजात रितेशवर निशाणा साधला आहे. तो म्हणतो, रितेशनं जेव्हा लय भारी आणि एक व्हिलन सारखे चित्रपट केले तेव्हा मी त्याला भविष्यातील मोठा सुपरस्टार समजत होतो. मात्र आता तो मिस्टर मम्मी सारखे चित्रपट करतो आहे. तो चित्रपट आणखी सात चित्रपटांबरोबर प्रदर्शित होतो आहे. जेव्हा तुम्ही आदित्य चोप्रा, करण जोहर यांना बॉलीवूडचे बाप मानता तेव्हा आणखी काय होणार, असा प्रश्न केआरकेनं यावेळी विचारला आहे.

केआरकेनं आणखी गंमतीशीर ट्विट केलं आहे. त्यामध्ये तो म्हणतो, रितेश आणि जेनेलिया वहिनी या वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स तयार करत असतात. त्यामुळे मी तर रितेशचा मिस्टर मम्मी पाहण्यापेक्षा त्याचे रिल्स पाहणे पसंत करेल. रितेश तू जितका स्क्रिनवर जास्त दिसशील तेवढा तू लवकर स्टार होशील. सध्या तू टीव्ही शो आणि रिल्समध्येच दिसन येतो.

Post a Comment

0 Comments