रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील
एक चर्चेचे नाव बनलीये. रश्मिकाने आपल्या अभिनयाची जादू अशी काही चालवलीये की, प्रत्येकजण रश्मिकाच्या प्रेमात पडले आहे. नुकताच सलमान खानने रश्मिका मंदानासोबत सामी सामी गाण्यावर डान्स केलाय. साऊथनंतर रश्मिकाच्या अभिनयाची जादू बॉलिवूडमध्ये देखील सुरू आहे. रश्मिकाचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा गुड बाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात वडील आणि मुलीचे असलेले सुंदर असे नाते दाखण्यात आलंय.
रश्मिका मंदाना सध्या बॉलिवूडमध्ये आपली पकड मजबूत करतंय. विशेष म्हणजे रश्मिकाला एका मागून एक जबरदस्त अशा बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर देखील मिळत आहेत. रश्मिकासोबतच टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. टायगर आणि रश्मिका एका चित्रपटामध्ये सोबत काम करणार असल्याच्या बातम्या पुढे येताय.
गेल्या अनेक दिवसांपासून चाहते रश्मिका आणि टायगर श्रॉफला एकत्र काम करताना पाहण्यास इच्छुक आहेत. रोहित धवन, सिद्धार्थ आनंद निर्मित 'रॅम्बो'च्या रिमेकसाठी टायगर श्रॉफ आणि रश्मिका मंदानासोबत काम करणार आहेत. रॅम्बोमध्ये रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असल्याचे देखील एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रोहित धवन आणि सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेविषयी रश्मिका मंदानासोबत चर्चा देखील केल्याचे कळतय. इतकेच नाही तर रश्मिकाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे. रश्मिका सध्या पुष्पा 2 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यक्त आहे. तर टायगर श्रॉफ देखील बडे मियां छोटे मियांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
0 Comments