सोलापुरातून पीएफआयचा कार्यकर्ता असिफ शेखला घेतले ताब्यातसोलापूर |

राज्यात रात्रीपासून पीएफआयच्या अनेक ठिकाणावर छापेमारी सुरू केली आहे. औरंगाबादमधून 9 तर सोलापुरातून 1 जण ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इतर ठिकाणीही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सोलापुरातील सहारा नगर येथील असिफ शौकत शेख(वय 40 वर्ष,रा,सिद्धेश्वर नगर,सहारा नगर जवळ,सोलापूर)याला ताब्यात घेण्यात आले आहे.गेल्या अनेक महिन्यापासून असिफ हा ,पीएफआय संघटनेचा सोलापुरातील म्होरक्या म्हणून काम पाहत होता.सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असिफ शेख याने अनेकदा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना घेऊन विविध मागण्या करत आंदोलन देखील केले होते.

असिफ शेख हा मदिना चौकात मासे तळण्याचा व्यवसाय करत होता-

असिफ हा विवाहित आहे.आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने सोलापूर शहरात असलेल्या मदिना चौक येथे मासे तळण्याचा व्यवसाय करत होता.त्यासोबत पीएफआय या संघटनेचा सोलापुरातील धुरा सांभाळत होता.असिफ हा विवाहित असून चार मुलं आहेत.भारतीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.या कारवाईने सोलापुरात खळबळ उडाली आहे.प्रतिबंधात्मक म्हणून कारवाई केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.कोर्टात हजर करून पूढील कारवाई केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments