मोदी-शाह यांचे हस्तक होणे केव्हाही चांगलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथील जाहीर सभा झाली. एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंवरती मोठी टीका केली. सामनातून सातत्याने एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीका केली जाते त्यालाही उत्तर दिले आहे. उध्दव ठाकरे एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान मोदी आणि अमित शाहचे हस्तक असल्याचे म्हणत असतात यावर एकनाथ शिंदेंनी मोठे विधान केले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, माझी साबणाचे बुडबुडे म्हणून टिंगल करण्यात आली. मात्र, याच साबनाने त्यांची चांगली धुलाई केली. शिंदे गट हे अमित शहा- मोदींचे हस्तक असल्याचे हे सांगतात याचा आम्हाला काही राग नाही. कारण याकुब मेमनसारख्या देशद्रेह्याची कबर सजवणाऱ्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या अमित शाह आणि नरेंद्र मोदींचे हस्तक होणे केव्हाही चांगले असा टोला ठाकरेंना लगावाला.

Post a Comment

0 Comments