विधायक ! भूम परांडा वाशी मतदारसंघातील विधवा प्रतिबंधाचे १०० ठराव जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द


दि. २ सप्टेंबर, २०२२  रोजी विश्वराज फाउंडेशन मार्फत भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील तब्बल १०० ग्रामपंचयातींद्वारे घेण्यात आलेले विधवा प्रथा बंदी ठराव जिल्हाधिकारी यांना सुपूर्द करण्यात आले.

 कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने राज्यात सर्वप्रथम या प्रथेविरोधात ठराव घेऊन स्त्रीमुक्ती लढ्यात एक महत्वाचे पाऊल उचलले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत एक पाऊल पुढे जाऊन शासनाच्या वतीने दि. १७ मे २०२२ रोजी एक परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना यासबंधीचा ठराव घेण्यासंदर्भात आवाहन केले होते. 

या आवाहनाला साद देत भूम, परंडा, वाशी मतदारसंघात कार्यरत असणाऱ्या विश्वराज फाउंडेशनच्या वतीने गावपातळीवर जनजागृती केली. त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत तब्बल १०० ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंदी बाबत ठराव घेण्यात आले आहेत. ते सर्व ठराव  मा. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना रीतसर सुपूर्द करण्यात आले.

Post a Comment

0 Comments