प्रियकरासोबत कट रचून तिने पतीचा गळा चिरला; अनैतिक संबंधाचा अखेर अंत


सोलापूर |

दशरथ  नागनाथ नारायणकर या व्यक्तीचा खून २१ सप्टेंबर रोजी झाला होता.क्राईम ब्रँचने या खुनाचा छडा लावत २४ तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे.मयत दशरथ नारायणकर याची पत्नी अरुणा नारायणकर व तिचा प्रियकर बाबासो जालिंदर बाळशंकर या दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे.या दोघांनी संगनमत करून दशरथ नारायणकर याचा गळा चिरून हत्या केली असल्याची कबुली दिली आहे.गुन्हे शाखेचे एपीआय संजय क्षीरसागर,महाडिक,संदीप पाटील,महेश शिंदे,निळोफर तांबोळी,कृष्णात कोळी,राजू मुदगल,कुमार शेळके यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यास महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

अनैतिक संबंधाचा शेवट झाला.अरुणा नारायणकर व दशरथ नारायणकर या दाम्पत्यास बारा वर्षांची मुलगी आहे.अरुणा हिचे बाबासो बाळशंकर यासोबत अनैतिक संबंध होते.या दोघांच्या अनैतिक संबंधात पती अडसर ठरत होता.त्यामुळे दोघांनी दशरथची गळा चिरून हत्या केली.अनैतिक संबंधाचा शेवट झाला आणि अरुणाने पती गमावला.पती पत्नी एक मुलगी अशा गोड संसारात तिसऱ्या व्यक्तीचा शिरकाव झाला आणि अख्खा कुटुंब उद्धवस्त झालं.

Post a Comment

0 Comments