शाहरुखने माझे लव लाइफ बरबाद केले 'या' अभिनेत्रीने केला गंभीर आरोप
अभिनेता शाहरुख खान हा बॉलीवूड मधला किंग खान म्हणून ओळखला जातो. अनेक जणी त्याच्यावर फिदा आहेत, यात काही वाद नाही. त्याच्या चांगल्या स्वभावासाठी आणि त्याच्या बायको बद्दल असलेल्या एकनिष्ठतेसाठी तो ओळखला जातो.

मात्र, बॉलीवूड मधीलच एका अभिनेत्रीने त्याच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'शाहरुखमुळे माझे लव लाइफ बरबाद झाले,' असा आरोप दुसरी तिसरी कोणी नाही तर आपल्या वक्तव्याने सतत चर्चेत असणारी स्वरा भास्कर हिने केला आहे. ती आपल्या 'जहाँ चार यार' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुलाखत देत असताना, तिने हे वक्तव्य केले आहे.

 "मी तरुण वयातच शाहरुखचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट पाहिला होता. तेव्हापासून, मी माझ्या आयुष्यातल्या राजच्या शोधात होते. मात्र, खऱ्या आयुष्यात राज वगैरे कोणी नसतो हे कळायला मला बरीच वर्ष गेली", असे म्हणत तीनही मिश्किल टिप्पणी केली आहे. सिंगल राहणे कठीण असले तरी देखील, मनपसंत जोडीदार शोधणे हे त्याहून अधिक कठीण असल्याचेही ती म्हणाली आणि त्यामुळे या सगळ्याला शाहरुख जबाबदार आहे असे तिचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments