महागाई गगनाला भिडली आहे पण नोकऱ्या मात्र नाही याचा फायदा घेत मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगारांना फसवणाऱ्या भामट्याला पोलिसांनी गजाआड केल्यानंतर यामध्ये मोठ्या टोळीचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी आतापर्यंत राहुरी पोलिसांनी तिघांना अटक केली असून टोळीत प्रसिद्ध चित्रपट सैराटमधील प्रिन्स अर्थात सूरज पवार देखील सामील असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींनी दिली आहे. अभिनेता सुरज पवार याने बनावट शिक्के तयार करणाऱ्याला भेटून कामासाठी शिक्के लागत असल्याचं सांगितले आणि आरोपींनी भारताच्या बनावट राजमुद्रा तयार करुन त्याचा गैरवापर केला आहे. या प्रकरणात सूरजला देखील अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
0 Comments