जमीनीसाठी सुनेने माहेरच्या संगनमताने सासुचे अपहरण करून केली बेदम मारहाण ; पोलिस अधीक्षकांच्या तक्रारी नंतर अखेर बारा दिवसांनी पांच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


कुर्डुवाडी |

मौजे उजनी व्हळे या.माढा येथील शेतकरी महिला शालन तानाजी लोकरे यांना १० सप्टेंबरच्या मध्यरात्री त्यांच्याच भाग्यश्री या सुनेने आई,,भाऊ, वडील यांच्याशी हातमिळवणी करून बेदम मारहाण करून जीपमध्ये बळजबरीने बसवून भोसरे ता.माढा येथे नेऊन डांबून ठेवले होते.तेथे नेऊन नातवाच्या नावाने जमीन कर म्हणून बेदम मारहाण करून धरणात टाकून मारण्याची धमकी दिली.

याबाबतचा सुगावा व माहिती कुर्डुवाडीच्या सामाजिक महिला कार्यकर्त्यां यांना लागल्यानंतर त्यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या मदतीने भोसरे येथील काळे कुटुंबियांच्या घरी धडक दिली.त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक वाघमारे व नितीन गोरे,ठाणे अंमलदार यांच्या मदतीने मिराताई शिंदे यांनी खोलीत डांबून ठेवलेल्या शालन लोकरे यांची सुटका केली, त्यावेळी त्यांना, लाकडाने,चाकू, वायरच्या सहाय्याने बेदम मारहाण केल्याचे दिसून आलेने कुर्डुवाडी ग्रामीण आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार घेऊन सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ पाठविण्यात आले.
         
 दरम्यान कुर्डुवाडी पोलिस घटनास्थळी जाऊन अपहृत महिलेची सुटका करूनही त्यासंबंधी कुर्डुवाडी पोलिसांनी एवढा मोठा गंभीर गुन्हा होऊनही दाखल न करता आरोपींना का पाठीशी घातले हे एक अनाकलनीय कोडेच आहे. याप्रकरणी आरोपी मोकाट असल्याचे व पुन्हा अपहृत महिलेच्या मुलाला व नातेवाईकांना त्रास देण्यास सुरुवात केल्यावर १६ सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
        
 या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्याला तंबी देऊन गुन्हा नोंद करण्यास सांगितले.मंगळवारी उशिरा कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात भोसरे येथील नवनाथ काळे, विठ्ठल काळे, अमीत नवले, वैशाली काळे,भाग्यश्री लोकरे (काळे) यांच्या विरुद्ध विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल केला असून कुर्डुवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम बोधे पुढील तपास करीत आहेत.


 
 
 
 
 
 

Post a Comment

0 Comments