बार्शीत जिल्हास्तरीय चित्रकला, वक्तृत्व आणि सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन


बार्शी |
  
येथील फ्रेंडस बहुउद्देशीय संस्था, हेल्थ क्लबच्या वतीने राष्ट्रपिता महात्गा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून इ.१ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला, वक्तृत्व आणि सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर रस्त्यावरील श्रीमती प्रयाग कराड विश्वशांती इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दि.१ व २ रोजी या स्पर्धा होत असल्याची माहिती अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दि.२ रोजी स्व.यशवंतराव चव्हाण सांस्क्रतिक भवन येथे पारितोषिक वितरण समारंभ होत असून प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकांना स्मतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. यावेळी प्रा.राजकुमार गायकवाड, मुख्याध्यापक रेखा पाटील, भगवान लोकरे, समाधान विधाते, दिपक धावारे, संभाजी नवले व हेल्थ क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments