आईनेच केला मुलीच्या वर्ग मित्राचा खून




शाळेत मुलांमध्ये प्रत्येक गोष्टीत स्पर्धा बघायला मिळते. या स्पर्धेमुळे पालक पाल्याला पुढाकार घेण्यास भाग पाडतात, त्यांच्यावर जबरदस्ती ओझे टाकतात. इथपर्यंत तर ठीक आहे. पण पाँडिचेरी मध्ये एका आईने आपल्या मुलीचा प्रथम क्रमांक यावा म्हणून जे केले ते जाणून घेतल्यावर अंगावर काटा
आल्याशिवाय राहत नाही.

आठवीतील मणिकंदन हा प्रत्येक क्षेत्रात पहिला असायचा तर आरोपीची मुलगी दुसरी. मुलीच्या मार्गातील काटा दूर व्हावा म्हणून आरोपीने मणीकंदनच्या शीतपेयांच्या बाटल्यांत विष कालवले आणि चौकीदाराकडे त्याची आई आहे असे खोटे सांगून त्याच्यापर्यंत पोहचते केले. यात चिमुरड्याचा मृत्यू झाला असून आरोपीला अटक झाली आहे. पोलिसांकडे आरोपीने सर्व कबुल केल्यामुळे पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments