सदृढ आरोग्यासाठी खुला जागेतील व्यायामाची नितांत गरज : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे


कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रात खुल्या व्यायामशाळेसाठी 5 लाखाचा निधी मंजूर 

कोतोली(३): दैनंदिन जीवनात सदृढ आरोग्यासाठी खुला जागेतील व्यायामाची नितांत गरज असून कोतोलीत प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारण्यात येणाऱ्या खुल्या व्यायाम शाळेचा उपयोग स्थानिक नागरिकांना नक्कीच होईल असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी केले. कोतोली येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रात खुल्या व्यायामशाळेसाठी जिल्हा क्रीडा विभागाकडून मंजूर करण्यात 5 लाखाचा निधीच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

        माजी डे. सरपंच सरपंच सज्जन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या वितरण समारंभास सरपंच प्रकाश पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, कोतोली आरोग्य समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गीते, ग्रामविकास अधिकारी एस डी मुसळे, माजी डे सरपंच सरदार पाटील, शशिकांत पाटील, अभिजीत कोतोलीकर, संतोष सूर्यवंशी, संदीप चौगुले यांच्यासह ग्रामस्थ, तरुण मंडळी आदी उपस्थित होते.

       यावेळी बोलताना सरपंच प्रकाश पाटील म्हणाले की, कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. कुणाल चव्हाण यांच्या पुढाकाराने व ग्रामपंचायत कोतोली यांच्या सहकार्याने खुल्या आरोग्य केंद्रासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. सदर मागणीसाठी क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी सततचा पाठपुरावा करून क्रीडा विभागाच्या माध्यमातून तात्काळ निधी मंजूर केला आहे. या खुल्या व्यायाम शाळेचा फायदा गावातील तरुणांना, खेळाडूंना तसेच रुग्णांना देखील होईल असा ठाम विश्वास आहे. 

        मानवी आयुष्य सदृढ आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकाने वेळ काढून व्यायाम केलाच पाहिजे, मोकळ्या हवेततील व्यायामाचा मानवी आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो. गावातील सर्वच नागरिकांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केली. दरम्यान खुली व्यायाम शाळा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात राबविण्यासाठी क्रीडा विभाग व आरोग्य विभागाच्यावतीने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

        यावेळी कोतोली तसेच परिसरातील खेळाडू, नागरिक यांच्यासाठी क्रीडा विभागामार्फत जिम, क्रीडांगण, कुस्ती मॅट तसेच खेळासाठी इतर अत्यावश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात आले असून यापुढेही जास्तीत जास्त उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मत क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी व्यक्त केले. 
      
      क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावर कोतोली तसेच परिसरात खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आपल्या गावासाठी ते सातत्याने एक खेळाडू व गावचा सुपुत्र म्हणून कार्यरत आहेत. या व्यायाम शाळेसोबत इतरही उपक्रम ते यापुढेही राबवतील असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष सज्जन पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र  या क्रीडा संघटनेच्या कार्यकारी सदस्यपदी अभिजीत कोतोलीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 


Post a Comment

0 Comments