भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापुरात द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. शंभर वर्षे जुनी असणारी लक्ष्मी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे देखील आदेश दिले. काही महिन्यांपूर्वी बँक आर्थिक अडचणीत आल्याने ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र ठेवीदारांचे पैसे परत मिळतील असे आश्वासन बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आले होते. दरम्यान त्यातील काही ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात आल्या.
94 हजार ठेवीदारांची ठेव बँकेमध्ये अडकून पडली आहे.
लक्ष्मी को-ऑपरेटिव बँकेचे 105 कोटी रुपयांची थकबाकी कर्जदारांकडे आहे. लवकरच या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार असल्याचा देखील सांगण्यात आले. रिझर्व बॅंक ऑफ इंडिया ने लक्ष्मी को-ऑपरेटिव्हबँकेवरती प्रशासक नियुक्त केलेला आहे. बँकेचे ठेवीदार 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करू शकतात, असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने सध्याच्या ठेवीदारांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. बँकेचा परवाना रद्द केल्याची घोषणा करताना मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, बँकेने दिलेल्या तपशिलानुसार 95 टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन मार्फत दिल्या जातील.
0 Comments