पंकजा मुंडेचं नाराजीवर मोठं वक्तव्य


भाजपमधील महत्वाच्या पंरतु सध्या उपेक्षित असलेल्या नेत्या पंकजा मुंडे या सतत चर्चेत असतात. त्यांना भाजपने राज्यसभे वरती पाठवले नाही. त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणूकीत तर विचार सुध्दा केला नाही. आता तर भाजप सत्तेत आल्यानंतरही सध्या त्या कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे लवकरच भाजपला रामराम करणार अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत यावर त्यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच आपण पक्षात नाराज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला ही चर्चाच व्यर्थ वाटते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व मंत्रिमंडळातील नेत्यांचे चेहरे एका रांगेत लावा, त्यात माझाही फोटो लावा. माझ्या चेहऱ्यात काही कमी फ्रेशनेस आहे का? मी अत्यंत फ्रेश आहे. रूसणे-फुगणे हे वैयक्तिक असते सार्वजनिक जीवनात या गोष्टींना फार महत्व
नसते. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्ताराआधी त्यांचा बदललेला सूराचा परिणाम होणार का हे वेळच सांगेल.

Post a Comment

0 Comments