सोलापूर | 25 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी मंडल अधिकार्‍यासह कोतवालाला अटक



वारस नोंदीच्या हरकतीवर सुनावणी होऊन तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची लाच मागितल्याने मंडल अधिकार्‍यासह कोतवालास दोन वेळा पडताळणी करून अँटीकरप्शन विभागाने ताब्यात घेतले आहे.

मदनसिंग सुपडसिंग परदेशी वय ३५ वर्षे, पद- मंडल अधिकारी, अपर तहसील कार्यालय मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर, २) मल्लिनाथ रेवणसिध्द बाळगी वय ३६ वर्षे, पद- कोतवाल, अपर तहसील कार्यालय मंद्रुप ता. दक्षिण सोलापूर.या दोघांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.

प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी कार्यालय येथे दिलेल्या वारस नोंदीच्या हरकती अर्जावर सुनावणी होवून तक्रारदार यांचे बाजुने निकाल देणेसाठी यातील आलोसे कोतवाल मल्लिनाथ बाळगी यांनी मंडळ अधिकारी परदेशी यांचे करिता म्हणुन तक्रारदार यांचेकडे २५,०००/- रुपये लाचेची मागणी केली व त्याबाबत खात्री करुन देणे करिता तक्रारदार यांचे मंडळ अधिकारी परदेशी यांच्याशी फोनवरुन बोलणे करुन दिले असता मंडळ अधिकारी परदेशी यांनी त्यास संमती दिल्याने दोन्ही आलोसे यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.  ही कारवाई उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर पोलीस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना अतुल घाडगे, पोशि स्वप्नील सण्णके, चापोशि उडानशिव सर्व ने. अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

Post a Comment

0 Comments