‘आता १२ आमदारांची यादी राज्यपाल लवकर जाहीर करतील. पण १२ आमदारांच्यायादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही, पंकजांनी आता पावलं उचलावी, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना एकाप्रकारे ऑफर देऊन टाकली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये राष्ट्रवादीची जनसंवाद यात्रा पार पडली.
यावेळी बोलत असताना अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसंच, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबद्दल माहिती मिटकरींनी उघड केली. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला आहे. ज्या पद्धतीने तिकीट द्यायचं आणि सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला.
रोहिणी खडसेंना हे लक्षात आलं. आता माझ्या पंकजा मुंडे यांच्याही लवकर लक्षात यायला पाहिजे. कारण, १२ आमदारांची यादी आहे, ती यादी राज्यपाल लवकरच मान्य करतील. मुळात राज्यपालच भाजपचे आहे. पण मला असं समजलं की दुर्दैवाने १२ आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे आपला पक्षबप्रामाणिकपणे वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसते
आहे.
रोहिणी खडसे यांना पुढचं भविष्य लवकर कळलं, त्यांनी लगेच राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता पंकजा ताईंना सुद्धा याची जाणीव असावी किंवा असेल, त्यामुळे त्यांनी पाऊल उचलावी, असं म्हणत मिटकरींनी एका प्रकारे पंकजांना थेट ऑफरच देऊन टाकली.
0 Comments