शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक ?



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये फुट पडली. पक्षाचे नाव, चिन्ह या सहित आता एकनाथ शिंदे गट दसरा मेळावा देखील हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेमध्ये अर्ज दाखल करूनही दसरा मेळावा घेण्याची परवानगी अजूनही देण्यात आलेली नाही.

त्यामुळे एकनाथ शिंदे आता दसरा मेळावा देखील हायजॅक करणार आहेत, असेच चिन्ह दिसत आहेत. दसरा मेळावा ही शिवसेनेची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली ही परंपरा यंदा आता एकनाथ शिंदे चालवणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षात दसरा मेळावा घेण्यात आला नव्हता. त्याला कारण कोरोना होतं. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे किंवा मुंबई महापालिका ते कारण ठरणार आहेत.

Post a Comment

0 Comments