फक्त पाचशे रुपयांसाठी भावानेच केला भावाचा खून; पोलिसांनी सर्व कुटुंबाला केले अटक



सोलापूर/प्रतिनिधी:

आईच्या श्राद्धात केलेल्या खर्चात एका मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी राहिली होती.ही उधारी देण्यासाठी मोठं भाऊ आणि छोटा भाऊ यामध्ये वादविवाद झाला व याचे पर्यावसान हाणामारीत झाले .मोठ्या भावाने छोट्या भावास दगड सळईने मारहाण करून त्याला ठार केले आहे.ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजारवाडी येथे घडली आहे.याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.सैफन घूडूसाब नदाफ(वय 41 ,रा पिंजारवाडी,दक्षिण सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.शहनाझ नदाफ यांनी याबाबत वळसंगपोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.पोलिसांनी मीरालाल घुडूसाब नदाफ,सलीम मीरालाल नदाफ,रफिक मीरालाल नदाफ,नियमतबी मीरालाल नदाफ यांना अटक केले आहे. आईचे श्राद्ध करण्यासाठी केलेल्या खर्चावरून फक्त पाचशे रुपयांसाठी मोठ्या भावाने छोट्या भावाचा खून केल्यामुळे सोलापुरात हळहळ व्यक होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी आईचे श्राद्ध झाले होते त्यामधील मंगल भांडारची पाचशे रुपये उधारी राहिली होती-
एक वर्षांपूर्वी मीरालाल व सैफन यांची आईचे निधन झाले होते.या दोघां भावांनी एकत्रितरित्या आईचे श्राद्ध करून गोरगरिबांना अन्नदान केले होते.यावेळी गावातील एका मशिदीत असलेल्या मंगल भांडारमधून भांडे भाड्याने घेतली होती.या मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी शिल्लक राहिली होती.ही उधारी मागण्यासाठी मशिदीचे विश्वस्त  जमादार हे 28 ऑगस्ट रोजी राहत्या घरी सकाळी सैफन नदाफ यांच्या घरी गेले होते.पण हि रक्कम मीरालाल नदाफ यांच्या कडून घ्या असे सांगितले होते.

मोठ्या भावाने नाही दिले तर मी देतो असे सांगितले होते-
सैफन नदाफ यांनी मंगल भांडार वाल्या व्यक्तीला सांगितले होते की,पाच शे रुपये मीरालाल नदाफ यांकडून घ्या.त्यांनी नाही दिले तर मी देतो असे सांगितले होते.यावरून दोघा भावांत वितुष्ट निर्माण झाले आणि वादविवाद झाला .मीरालाल नदाफ यांनी पाचशे रुपये उधारी देऊन जमादार यांना पाठविले.पण छोटा भाऊ सैफन नदाफ याविरोधात कट रचला.

शेतातील मोटार चालू करण्यासाठी आलेल्या भावाचा काटा काढला-
पाचशे रुपयांवरून मीरालाल नदाफ हा छोटा भाऊ सैफन नदाफ यावर चिडून होता.सैफन नदाफ हा 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेला होता.त्यावेळी सैफन हा  एकटा  असल्याची संधी साधून मीरालाल नदाफ यांनी पाच शे रुपयांसाठी कर्जदारांना माझ्या घरी पाठवतो का असा जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी मीरालाल यांचा मुलगा रफिक नदाफ याने पाठीमागून येऊन सैफन नदाफ यांचे हातपाय पकडला,मीरालाल नदाफ यांनी दगडाने,सळईने छोटा भाऊ सैफन नदाफ यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली.मीरालाल नदाफ यांची पत्नी,नियामतबी नदाफ,दुसरा मुलगा सलीम नदाफ यांनी सैफन नदाफ यांच्या डोक्यावर व सर्वांगास जबर मारहाण केली.

जखमी सैफन नदाफ यांचा उपचारादरम्यान मृत्य-
 शहनाज नदाफ यांनी उपचारासाठी पती सैफन यांस सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.पण डोक्याला गंभीर इजा झाल्याने जखमी उपचारास प्रतिसाद देत नव्हता.अखेर 30 ऑगस्ट रोजी दुपारी सैफन यांची प्राणज्योत मालवली.

Post a Comment

0 Comments