माढा तालुक्यातील टेंभुर्णीजवळ आठ किलोमीटरवर असलेल्या दगड अकोले पाठी जवळ झालेल्या माल ट्रक व अल्टोकारच्या धडकेत टेंभुर्णी येथील पती-पत्नी जागीच ठार झाले. तर त्यांचा नातू जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गोरख मारुती माने (वय 55) व ताई गोरख माने (वय 46) अशी अपघातात पावलेल्या पती-पत्नी आहेत तर नातू अनमोल शांतीलाल माने (वय वर्ष 2) हा बचावला आहे. मयत दाम्पत्य हे आल्टो कार एम एच 09 ए. बी 7254 या गाडीने त्यांचा पंढरपूर मध्ये असलेला नातू अनमोल याला घेऊन आपल्या टेंभूर्णी गावी अनमोलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंढरपूर हून टेंभूर्णी कडे घेऊन निघाले होते.
टेंभुर्णीहून पंढरपूरकडे येणारा मालट्रक क्रमांक एम एच आर 3303 ने अल्टो कारला जोरात धडक दिली. या झालेल्या अपघातात गोरख माने व ताई माने हे दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. त्यांचा नातू अनमोल माने हा दोन वर्षांचा बालक बचावला. त्याचे पायाला जखम झाली असून त्याच्यावर टेंभुर्णीतील पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. नातू अनमोल चा वाढदिवस साजरा करण्याची माने पती-पत्नीची इच्छा अपुरी राहिली. या घटनेने टेंभुर्णी परिसरात व्यक्त होत आहे.
0 Comments