लिव्ह इन रिलेशनशिपच्या गर्लफ्रेंडने रागाच्या भरात घेतला प्रियकराचा जीव


हल्ली लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसतोय. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जोडीदार  लग्नाशिवाय जरी एकत्र राहत असले तरी त्यांच्यात नवरा-बायको प्रमाणेच वाद किंवा भांडणं होणं स्वाभाविक आहे. पण गाजियाबाजदमध्ये एक खळबळजनक घटना घडली. लिव्ह इन मध्ये राहत असलेल्या एका महिलेने भांडणादरम्या आपल्या जोडीदाराचा चक्क जीवच घेतला. यात आश्चर्याची गोष्ट अशी की, एका अतिशय क्षुल्लक कारणावरून हे भांडण वाढलं आणि त्यातून त्या महिलेने आपल्या जोडीदाराला ठार मारलं. त्यानंतर, पोलिसांपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी त्या महिलेने असा काही प्लॅन रचला की ज्याचा कोणालाच अंदाज येऊ शकला नसता. पण अखेर त्या जोडीदाराचा मृतदेह सापडल्यानंतर त्या महिलेलाही अटक करण्यात आली.

गाजियाबादच्या थाना टीला चौकात शनिवारी रात्री पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन गस्त घातल होती. त्यावेळी पोलिसांना एक महिला अतिशय अवजड बॅग खेचत नेताना दिसली. बॅग खेचणाऱ्या महिलेला पोलिसांची गाडी दिसल्यानंतर महिला गोंधळली आणि ती रस्त्याच्या अजून कडेला जाऊ लागली. महिलेच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे महिलेला थांबवून पोलिसांनी जेव्हा बॅग तपासली तेव्हा बॅग उघडल्यावर पोलिसांना धक्काच बसला. कारण त्यात एका पुरूषाचा मृतदेह होता.

महिलेची सखोल चौकशी केल्यानंतर, तिचं नाव प्रिती शर्मा असल्याचं स्पष्ट झालं. तिने तिच्या पतीचे नाव दीपक यादव असल्याचं सांगितलं. हे दोघे गाजियाबादच्या तुलसी निकेतन परिसरात राहणारे होते. पण महिलेला बॅगेतील मृतदेहाबाबत विचारल्यावर तिने सांगितलं की तो मृतदेह तिच्या लिव्ह इन पार्टनर फिरोजचा आहे. फिरोज हा संभल चा रहिवासी होता. महिला आपल्या पतीपासून वेगळी होऊन ३-४ वर्षांपासून फिरोजसोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. ६ ऑगस्टच्या रात्री या दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून बराच वाद झाला. रागाच्या भरात फिरोज प्रितीला म्हणाला की, “तू तर चालू बाई आहेस, तू स्वत:च्या पतिशी प्रामाणिक राहू शकली नाहीस, माझ्यासोबत कशी काय नीट वागशील..." अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या जोडीदाराच्या तोंडून ऐकल्यानंतर प्रिती प्रचंड संतापली आणि रागाच्या आवेशात तिने थेट जोडीदारा जीव घेतला. रात्रीच्या वेळी तिने रागाच्या भरात त्याच्या गळा कापला. त्यानंतर त्याचा मृतदेह लपवण्यासाठी तिने सकाळी मोठी ट्रॉली बॅग विकत आणली. त्यात फिरोजचा मृतदेह भरून ती बॅग एखाद्या ट्रेनमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असतानाच तिला पोलिसांच्या गाडीने अडवल्यामुळे हा सारा उलगडा झाला.

Post a Comment

0 Comments