बार्शी! एकाला मोटरसायकलस्वाराने दिली धडक ; उपचारादरम्यान मृत्यू


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी परांडा रोडवर भराडीया पेट्रोल पंप इथे एकाला मोटरसायकलने धडक दिल्याची घटना घडली आहे, यामध्ये पादचारी हा गंभीरित्या जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ८ च्या दरम्यान घडली आहे, यामध्ये विष्णू शामराव उमाप (वय ५०) रा. धर्माधिकारी प्लॉट, गाडेगाव रोड बार्शी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या घटनेची फिर्याद धीरज आगतराव शेळके (वय ४०) यांनी शहर पोलिसात दिली आहे, आपल्या ताब्यातील वाहन हातगाहीने निष्काळजीपणे चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटरसायकलस्वार ओम राजू चव्हाण रा.फुले मंगल कार्यालय जवळ बार्शी याच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम ३०४ ए, ३३७,३३८ ,४२७ व मोटर अधिनियम कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments