सोलापूर! अडीच हजाराची लाच घेताना विस्ताराधिकारी व ग्रामसेवक यांना रंगेहाथ पकडले; अँटी करप्शन ची कारवाई



सोलापूर/प्रतिनिधी:

दिवसेंदिवस लाचखोरीच्या घटना वाढत आहेत अवघ्या अडीच हजार रुपयाची लाज घेताना अँटी करप्शनने पंचायत समिती विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांना रंगेहात पकडले आहे, पंधरावा वित्त आयोगाच्या कामाची बिले मंजूर करून घेण्यासाठी ही लाच स्वीकारली आहे.
सुरेश सुधाकर फारो, (वय ४५)ग्रामसेवक, पारे ता. सांगोला व  श्रवण बाजीराव घाडगे (वय ५६)विस्तार अधिकारी, पंचायत समिती कार्यालय सांगोला जि. सोलापूर यांना लाज घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.


सांगोला तालुक्यातील पारे गावातील गोरडवस्ती येथे पाईपलाईनचे काम १५ व्या वित्त आयोग सन २०२०-२०२१ अंतर्गत मंजुर झाले असुन सदरचे काम हे पारे ग्रामपंचायतीस मिळाले होते.  त्यानुसार घर नमुद काम पुर्ण झाल्यानंतर सदर कामाचे बिल मंजुर होवुन मिळणेकरीता तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता यातील ग्रामसेवक फासे यांनी सदर बिलावर सही करून पंचायत समिती सांगोला येथील विस्तार अधिकारी घाडगे यांचेकडे सादर करण्याकरीता स्वतः करीता १ टक्का १५०० रुपये पंचायत समिती येथुन बिल मंजुर होण्याकरीता विस्तार अधिकारी घाडगे करीप्रमाणे १५०० रु असे एकुण ३००० रुपयेची मागणी केली व सदर मागणीस विस्तार अधिकारी घाडगे यांनी संमती न तडजोडीअंती त्यांचे करीता ५००  रु कमी देण्यास सांगूण उर्वरीत रक्कम ग्रामसेवक यांचेकडे देण्यास सांगितली. ही तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी अँटीकरप्शन कडे दाखल केली होती. त्यानुसार सापळा लावून लाच घेताना ग्रामसेवकाला रंगीहात पकडले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अमलदार पोना स्वामी, पोना घाडगे, पोशि सन्नके, चापोना उडानशीव अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी केली.

भ्रष्टाचारा बद्दल काही माहिती असल्यास किंवा लोकसेवकाबद्दल तक्रार करायचे असल्यास टोल फ्री क्रमांक 164 वर संपर्क करावा किंवा
 संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in
ई मेल - www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार – acbmaharashtra.net
दुरध्वनी क्रमांक - ०२१७-२३१२६६८
व्हॉटस अॅप क्रमांक - ९९३०९७७००
संपर्क करावा असे आवहान अँटी करप्शन सोलापूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments