चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिह्यात प्रथमच प्रवेश केल्याबद्दल उस्फुर्त स्वागत व सत्कार


राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी प्रास्ताविकेत आदरणीय दादांचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेस नेहमीच मार्गदर्शन लाभलंय मंत्री झाल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले म्हणून या सत्कारचे आयोजन केले असल्याचे सांगितले.

 दादांनी अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूरच्या गेटवर मोठ्या आनंदाने संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल,फेटा, विठोबा-रुकमाई मूर्ती व तुळशीहार स्वीकारला. तसेच संघटनेच्या अडीअडचणी शासकीय पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.

 सदर प्रसंगी शहाजी पवार, अविनाश महागावकर,राज्य सहकोषाध्यक्ष मुरलीधर चव्हाण,सदस्य पद्माकर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत सहसचिव विनोद ननवरे बार्शी तालुका अध्यक्ष टिंकू पाटील,मल्टिकोर मीडियाचे संचालक अमित इंगोले, रोहन नलवडे तसेच सोलापूर जिल्हा, शहर, करमाळा, सांगोला तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments