सोलापूर | पोलीस निरीक्षकाने फिर्याद दिल्याने पोलीस नाईकवर गुन्हा दाखल


सोलापूर ; 


दोन वर्षांपासून वेळोवेळी सूचना करूनही विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपत्र सादर न केल्याप्रकरणी पोलीस नाईक विरुद्ध पोलीस निरीक्षकाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विकास दगडु देशमुख यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस नाईक सिध्दाराम धरेप्पा बरगुडे, (सध्या नेम सलगर वस्ती पोलीस ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


सन 2019 पासुन ते सन 2021 पर्यंत फौजदार चावडी पोलीस ठाणेत पोलिस नाईक बरगुडे यांनी प्रलचित गुन्ह्यामध्ये न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्याचा कालावधी होवून गेलेला आहे. विदयमान वरीष्ठ पोलीस निरीक्षक तसेच तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी पोना बरगुडे यांना गुन्हे निर्गती करीता वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. तरी देखील त्यांनी आदेशाकडे दुर्लक्ष करून गुन्हे निर्गती केलेली नाही.त्यामुळे कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल फिर्यादी पोलीस निरीक्षक देशमुख यांनी बरगुडे विरुद्ध सरकार तर्फे तक्रार दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय गायकवाड करत आहेत.

Post a Comment

0 Comments