पंढरपूर/प्रतिनिधी:
पंढरपुर शहर व परिसरातील ज्या ठिकाणी मोटार सायकल चोरी जाणेचे प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणचे घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवुन गोपनीय बातमीदार यांचे मार्फतीने मोटार सायकली चोरीबाबतची माहिती काढणेचे काम सुरू असताना बातमीदाराकडुन एक बातमी मिळाली की, एक इसम पंढरपुर टाकळी बायपास येथे चोरीचे मोटारसायकल विक्री करणेकरीता येणार असलेबाबतची माहिती मिळालेने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचुन त्याठिकाणी संशयास्पदरित्या फिरत असलेल्या इसमास ताब्यात घेतले. व पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, त्याने
आपण चोरीची मोटारसायकल विक्री करीता घेवुन आलो असलेची सांगीतलेने त्याचेकडे सलगपणे चौकशी केली असता त्याने आपण तसेच आपले साथीदारांनी पंढरपूर शहर व परिसरातील त्याचप्रमाणे सांगली, कोल्हापूर,
सातारा, पुणे, अहमदनगर, बीड या जिल्ह्यातून देखील मोटरसायकली चोरल्याचे सांगीतले. या सर्व संशयितांच्या वास्तव्याची माहिती हस्तगत करून घेवुन त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा सखोल तपास केला असता त्यांनी सर्व गुन्हयातील व इतर ठिकाणी चोरलेल्या ६४ मोटरसायकली आरोपीतांनी काढुन दिलेने या सर्व मोटार सायकली गुन्हयाचे तपासकामी जप्त करणेत आल्या आहेत.
वरील प्रमाणे गुन्हयात जप्त केलेल्या मोटारसायकली हया पंढरपुर शहरातुन व परिसरातून तसेच सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापुर, पुणे, अहमदनगर, बीड या जिल्हयातील आहेत.
आरोपीची नावे-
१) विशालसिंग गिरधरसिंग राजपूत रा. टाकळी बायपास तालुका. पंढरपूर २) प्रशांत दिलीप भोसले रा. लोटेवाडी तालुका सांगोला ३) आकाश दीपक खिलारे रा. महाद्वार घाट पंढरपूर ४) वैभव शंकर लवटे लोटेवाडी ता. सांगोला ५) लखन उर्फ लक्ष्मण महादेव पडळकर रा. लोटेवाडी तालुका सांगोला ६) संकेत नीलकंठ शिंदे रा. भाळवणी तालुका पंढरपूर ७) दीपक परमेश्वर हाके रा. कटफळ तालुका सांगोला ८) प्रदीप ज्ञानेश्वर शेळके रा. कटफळ तालुका सांगोला
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम, व अरुण पवार, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सी. व्ही केंद्रे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, सपोफौ राजेश गोसावी, पोहेकॉ बिपीन ढेरे, सुरज हेंबाडे, पोहेकॉ शरद कदम, पोलीस नाईक सचिन इंगळे, सुनिल बनसोडे, दादा माने, राकेश लोहार, शोएब पठाण, सचिन हेंबाडे, सुजित जाधव, पोका समाधान माने तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोका अन्वर आतार यांनी केली आहे.
0 Comments