बाबर आझमकडून पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टरला खास भेट, ‘इतके’ लाख बक्षिस म्हणून देणार



बर्मिंगहमध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत पाकिस्तानचा वेटलिफ्टिर नूह दस्तगिर बटनं  देशासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. ज्यानंतर त्याचं सर्वत्र कौतुक होत असून पाकिस्तानचा क्रिकेट कर्णधार बाबर आझम यानंही नूहला 20 लाख रुपयांचं बक्षीस स्वत:कडून जाहीर केलं आहे. कोहलीबाबत सकारात्मक प्रतिक्रियेनंतर बाबरनं नुकतीच क्रिडा जगतात अनेकांची मनं जिंकली होती, ज्यानंतर त्याच्या या कृतीने पुन्हा एकदा सर्वांची मनं बाबरनं जिंकली आहेत.

नूह दस्तगिर बटनंवेटलिफ्टिंगमध्ये तब्बल 405 किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये पाकिस्ताननं पहिलंच सुवर्णपदक जिंकल. नूहने 109 किलो वजनी गटातील स्नेच प्रकारात 172 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 232 किलोग्राम वजन उचललं असं एकूण त्यानं 405 किलोग्राम वजन उचललं. त्यामुळे त्यानं एक रेकॉर्डब्रेक कामगिरी करत गोल्ड जिंकलं. त्याच्या या कामगिरीबद्दल बोलताना बाबरने नूह याने संपूर्ण देशाचं नाव मोठं केलं असून ही एक मोठी गोष्ट आहे. असं म्हटलं आहे.

नूह दस्तगिर बटसाठी भारताची मीराबाई प्रेरणास्त्रोत

बर्मिंगमध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात पाकिस्तानच्या नूह दस्तगिर बटनं चांगली कामगिरी करत देशासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलंय. त्यावेळी नूह दस्तगिर बटनं मीराबाई चानूबद्दल अभिमानास्पद वक्तव्य केलंय. “जेव्हा मीराबाई चानूनं माझं कौतूक केलं आणि माझ्या कामगिरीचं कौतूक केलं. तो क्षण माझ्यासाठी अभिमानाचा होता”. एवढेच नव्हे तर, मीराबाई चानू त्याची प्रेरणास्थान असल्याचंही नूह दस्तगिर बटनं म्हटलंय. दरम्यान, भारताकडून खूप प्रेम मिळालं, असंही तो म्हणाला.

Post a Comment

0 Comments